अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोरोनाच्या काळात जनतेची मोठी सेवा करुन हजारो कोरोनो रुग्णांचे प्राण वाचविले. या कार्याचा सन्मान म्हणून पीपल्स हेल्पलाईन,
भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने आमदार लंके यांना लोककर्मा म्हणून जाहीर सन्मान केला जाणार असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अॅड. कारभारी गवळी यांनी दिली. आमदार लंके सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करीत असून, त्यांच्याकडून घरकुल वंचितांना मोठ्या अपेक्षा आहेत.
संगमनेर आणि पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमीन खडकाळ आणि पड आहेत. त्या जमिनीवर सौर ऊर्जा उद्योगग्राम प्रकल्प देशी आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून उभे करण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहेत. पारनेर तालुक्यात किमान दहा हजार नापिक अशा माळरानाच्या जमिनी उपलब्ध होऊ शकणार आहे.
शेतकर्यांची जमीन मालकी कायम ठेवून, त्यांना कंपनीमधील शेअर देऊन दर महिन्याला एकरी दोन हजार रुपये लाभांश मिळण्याची यामुळे शक्यता निर्माण झाली आहे. आमदार लंके यांचे मार्गदर्शन आणि सहभाग मिळवण्यासाठी संघटनांनी प्रयत्न सुरू केला असल्याचे संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
अहमदनगर शहरातील एमआयडीसी जवळील निंबळक आणि इसळक येथील माळरानाच्या नापीक जमिनीवर लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजनेतंर्गत किमान पाच हजार घरकुल वंचित व कामगारांना आत्मनिर्भर भूमी गुंठा राबविण्यासाठी या संघटना प्रयत्नशील आहेत.
मूळ जमीन मालकाच्या पुढाकारातून रस्ते, पाणी, वीज उपलब्ध करून प्रत्येकी एक गुंठा किमान बाजार भावाने घरकुलांची उपलब्ध करता येणार आहे.
या संदर्भात अनेक शेतकर्यांशी संपर्क सुरू आहे. सरकारी अनुदानाशिवाय गरिबांना घरे मिळवून देण्यासाठी आत्मनिर्भर भूमीगुंठा योजना उपयुक्त ठरणार आहे. यासाठी आमदार लंके यांचे सहकार्य घेण्यात येणार असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम