अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- कोरोना महामारीच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून आमदार नीलेश लंके यांनी व कार्यकर्त्यांनी शरदचंद्रजी पवार कोविड सेंटरच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील हजारो नागरिकांसह परराज्यातील नागरिकांचा जीव वाचवला आहे.
त्यांच्या कामाची दखल केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाने घेतली. परंतु जाणून बुजून आमदार लंके यांची प्रतिष्ठा मालिन करण्याच्या हेतूने बदनामी चालवली आहे. ती आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा राष्ट्रवादी पदवीधर संघाचे जिल्हाध्यक्ष शरद चोभे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविलेल्या निवेदनात दिला आहे.
दरम्यान बदनामी करणाऱ्या तहसीलदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. परनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा कारभार संपूर्ण पारनेर तालुक्याने पाहिला असून विविध संघटनांकडून अनेक गंभीर आरोप त्यांच्यावर झाले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
ऐवढेच नव्हे तर तहसीलदार देवरे यांच्यावरील असलेले गंभीर आरोप सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी भोसले यांनी तहसीलदारांवर कारवाईबाबत विभागीय आयुक्तांना सहा पाणी अहवाल पाठविला आहे. आपल्यावरील कारवाई टळावी या हेतूनेच त्यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मिडियात व्हायरल झाली.
त्यात त्यांनी लोकनेते आमदार नीलेश लंके यांच्यावर व कार्यकर्त्यांवर बिनबुडाचे आरोप केले आहेत. कोणाच्या तरी सांगण्यावरुन आमदार नीलेश लंके यांची बदनामी करण्याचे षडयंत्र रचल्याचे दिसून येत आहे.
आमदार नीलेश लंके यांची बदनामी केल्याबद्दल तहसीलदार देवरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे जिल्हाध्यक्ष शरद चोभे यांनी निवेदनात म्हटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम