आमदार निलेश लंके यांच्या अडचणी वाढल्या !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिला आहे.

या क्लिपमुळे पारनेर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.यापूर्वी अमरावतीचे वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचा संदर्भ देत देवरे यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे.

या क्लिपमध्ये महिला अधिकारी म्हणून काम करताना नोकरीत होणारा त्रास तसेच वरिष्ठांचे दुर्लक्ष या बाबत सविस्तर कथन ऑडिओ क्लिपमध्ये केले आहे. तहसीलदार यांच्या ऑडिओ क्लिपमुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.

नगर जिल्ह्यातील पारनेर येथील तहसिलदार ज्योतीताई देवरे यांनी केलेले अतिशय गंभीर आरोप, आत्महत्येचा इशारा देणारी त्यांची ऑडिओ क्लिप, एकूणच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने हस्तक्षेप करून

त्यांना न्याय देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिले आहे थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा विषय उचलून धरल्याने आता अडचणी वाढल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News