अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार राशीन येथील संत रोहिदासनगरमध्ये आले असताना आपल्या घराच्या अंगणातच चप्पल तयार करीत बसलेले शिवाजी कांबळे त्यांना दिसले.
त्यांना पाहून आमदार पवार थेट कांबळे यांच्याकडे गेले. त्यांनी तयार केलेली चप्पल हातात घेऊन पाहत त्यांच्या व्यवसायाबाबत माहिती घेतली. अरे व्वा…..तुम्ही तर ब्रॅण्डेड चपलेला लाजवेल अशा चप्पला तयार करीत आहात,

अशी चप्पल तर मी लहानपणी घातली होती, असे म्हणत तयार झालेली विमान टायरची चप्पल हातात उचलून घेत आमदार रोहित पवार यांनी चप्पल तयार करणाऱ्या राशीनमधील कारागीराची विचारपूस केली.
हाच व्यवसाय मोठ्या प्रमाणात करून उद्योजक व्हा, असे आवाहन केले. दरम्यान पवार यांनी कांबळे यांनी मौलिक सल्ला देखील दिला. पवार म्हणाले कि, या चपला टिकाऊ आणि दर्जेदार आहेत.
मात्र आजच्या फॅशनच्या जमान्यात त्यांना मागणी किती आहे, हा व्यवसाय व्यापक प्रमाणात करा, केंद्र-राज्य सरकारच्या विविध योजना आहेत, त्या योजनेचा लाभ घेऊन उत्पादन वाढवा.
बॅंकांकडे जाऊन व्यवसायासाठी कर्ज घ्या, आजच्या जमान्यात चालेल असे नवीन उत्पादन तयार करा, त्याचे ब्रॅंडिंग करा, यासाठी काही अडचण आल्यास मला भेटा, मी आहेच. असा शब्द आमदार पवार यांनी कांबळे यांना दिला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|