आ.राजळे यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी आ.मोनिका राजळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यांनी अर्ज दाखल केलेल्या सेवा संस्था मतदारसंघातून इतर उमेदवारांनी आज अर्ज माघारी घेतले. त्यामुळे आ.राजळे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

आ.राजळे यांनी अर्ज दाखल करतानाच बिनविरोध निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला होता. सर्वाधिक ठराव आपल्या बाजूने असल्याने त्या निश्चिंत होत्या. आज इतर उमेदवारांच्या माघारीमुळे त्यांचा दावा प्रत्यक्षात उतरला आहे. दरम्यान जिल्हा सहकारी बँक निवडणुकीच्या मुद्यावरून माजी मंत्री राधाकृष्ण विखे व आमदार मोनिका राजळे यांच्यातील संघर्ष टोकाला पोहचला होता.

मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात एकसंघ वाटणाऱ्या या दिलजमाईत जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत विखे समर्थकांनी राजळे यांच्या विरोधी पवित्रा घेतला होता. यामुळे आमदार राजळे समर्थक चांगलेच नाराज झाले होते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र पॅनल उभा करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

या निवडणुकीत मोनिका राजळे यांनी तालुक्यातील सेवा सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताच त्यांच्या विरोधात राधाकृष्ण विखे यांचे खंदे समर्थक संभाजी वाघ यांच्या पत्नी मथुरा वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजळे गटात अस्वस्थता निर्माण झाली होती.

त्यांनी अर्ज दाखल केलेल्या सेवा संस्था मतदारसंघातून इतर उमेदवारांनी आज अर्ज माघारी घेतले. त्यामुळे आ.राजळे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News