अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:-भाजपला हे सरकार अडचणीत आणायचे आहे. त्यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यात एक ठळक गोष्ट अशी की भाजपला वाटते की राजकारण त्यांनाच कळतं.
त्यामुळे प्रत्येकवेळी ते राजकारणच खेळत जातात. मात्र, जेव्हा सत्य पुढे येते, तेव्हा ते उघडे पडतात. अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी भाजपावर कडकडून टीका केली आहे.

यावेळी रोहित पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख व परमबीर यांच्या वादाच्या मुद्द्यावर देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. रोहित पवार म्हणाले की, एखादा वरिष्ठ अधिकारी जेव्हा आरोप करतो तेव्हा त्याकडे लक्ष देण्याची गरज असते.
त्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. पण जेव्हा हे पत्र वाचले तेव्हा असे लक्षात आले की, त्यामध्ये तारखांचा घोळ झालेला आहे.
त्यामुळे या पत्रातील आरोपांमध्ये किती तथ्य आहे, हे तपासून पाहण्याची गरज आहे. हाच अधिकारी जेव्हा पदावर असतो, तेव्हा एक शब्दही बोलत नाही आणि पदावरून दूर केल्यावर बोलणे,
सुप्रीम कोर्टात जाणे, दिल्लीत जाऊन कोणाची भेट घेतली या सर्व गोष्टी पहाव्या लागतील. मात्र, अधिकाऱ्यांवर जर काही राजकीय लोकांचा प्रभाव असेल तर ते माझ्यासारख्याला चुकीचे वाटते.
अशीच गोष्ट सध्याच्या या प्रकरणात घडत आहे. यात भाजप फक्त राजकारण करीत आहे, असा वास अनेक लोकांना यायला लागला आहे. आर्थिक अडचणीत असून सुद्धा हे सरकार काम करीत आहे,
हे लोक पहात आहेत. त्यामुळे जेवढे भाजपवाले राजकारण करतील तेवढी त्यांच्या विरोधात लाट निर्माण होईल, असेही रोहित पवार म्हणाले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|