रेमडेसिवीर’च्या मुद्द्यावरून आमदार रोहित पवारांनी साधला खासदार विखेंवर निशाणा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. यातच कोरोना रुग्णांसाठी काहीसे उपयुक्त असलेलेरे मडेसिवीर इंजेक्शनच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे.

यातच जिल्ह्याचे खासदार सुजय विखे यांनी हवाई दौरा करत या इंजेक्शनचा मोठा साठा जिल्ह्यात आणला आहे.

आता याच मुद्द्यावरून विखे अडचणीत सापडले आहे. तसेच याचा अनुषंगाने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खासदार सुजय विखे यांच्यावर निशाणा साधला आहे.

रेमडेसिवीर वाटप हा पूर्णपणे केंद्र आणि राज्य सरकारचा विषय आहे. केंद्राने राज्याला पुरवठा केल्यानंतर शासकीय साखळीतून त्याचे वाटप व्हायला पाहिजे. वैयक्तीक पातळीवर अशा पद्धतीने रेमडेसिवीरचे वाटप होने योग्य नसून, प्रत्येकाने नियम पाळायलाच हवेत.

अशा शब्दात पवार यांनी विखेंना खडेबोल सुनावले आहे. दरम्यान नुकतेच खा. सुजय विखे यांनी खास दिल्लीहून चार्टर विमानाने आणलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन वाटपाचा मुद्दा न्यायालयात गेल्याने चांगलाच चर्चेत आला आहे.

न्यायालयाने याबाबत विमानतळावरील व्हिडीओ फुटेज जप्त करण्याचे आदेश दिले आहे. परिस्थिती पाहून अनावश्यक खर्च टाळावा कोरोनाचे संकट प्रत्येक राज्यापुढे असताना केंद्राने राज्यांना आर्थिक आणि औषधांची मदत करणे अपेक्षीत आहे.

अशा बिकट परिस्थितीमध्ये संसदेच्या नवीन इमारतीवर खर्च न करता त्या पैशातून राज्यांना आर्थिक मदत केली पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe