अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. मतदारसंघाच्या विकासासाठी पवार यांनी ही भेट घेतली.
नागरिकांसाठी सर्व सुविधांची पूर्तता करता यावी यासाठी निधी मिळावी म्हणून त्यांनी अर्थमंत्र्यांकडे मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे.
हे आहेत भेटी मागचे कारण :- रोहित पवार यांनी निर्मला सीतारमण यांच्याकडे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यामुळे, ग्रामीण भागातील क्रयशक्ती वाढल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणे, लिंग समानता सुधारणे, स्थानिक राजकारणात सहभाग वाढवणे, सार्वजनिक संपत्ती वाढवण्यास मदत झाली.
म्हणूनच, या धर्तीवर शहरी असंघटित क्षेत्रातील कामगारांना व्यापक आणि खात्रीशीर रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि त्यांच्यासाठी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम सुरू करावा अशी मागणी केली आहे. सध्या आपल्या मतदारसंघातील पायाभूत सुविधांचा निर्माण आणि नुतनीकरणासाठी रोहित पवार हे निधी उपलब्ध करून घेत आहेत.
आमदार रोहित पवार यांनी याआधी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांचीही भेट घेतली. तसेच केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांची आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन USTTAD च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड तालुक्यांचा समावेश करण्याची विनंती केली.
अहमदनगर जिल्हा राष्ट्रीय वयोश्री योजनेत (RVY) समाविष्ट करण्याबाबत रोहित पवारांनी निवेदन दिले आहे. देशातील दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांसाठी भौतिक सहाय्य आणि सहाय्यक-जीवन उपकरणे पुरवण्यासाठीची RVY ही एक केंद्रीय क्षेत्र योजना आहे.
अहमदनगर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा असूनही या योजनेत समाविष्ट नसल्यामुळे याचा समावेश करण्यात यावा, अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम