रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तडजोड करण्यासाठी दबावतंत्राच्या हालचाली !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तडजोड करण्यासाठी दबावतंत्राच्या हालचाली सुरू झाल्या आहेत ! रेखा जरे यांचे चिरंजिव रूणाल जरे यांनी स्वतःच यासंदर्भात पोलिस अधिक्षकांना मंगळवारी निवेदन सादर केले असून अशा तडजोडींसाठी पुढाकार घेणारांवर योग्य ती कायदेशिर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मागील वर्षी ३० नोहेंबर रोजी नगर पुणे महामार्गावर रेखा जरे यांची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृन हत्या करण्यात आली होती.पोलिसांच्या तपासा दरम्यान मोबाईलवरील संभाषणाच्या अधारे या हत्यकांडाचा मास्टरमाईंड हा पत्रकार बाळ बोठे हा असल्याचेही निष्पन्न झाले.

हत्या करणारे दोघे तरूण तसेच सुपारी देउन हत्या घडवून आणणारे आरोपी जेरबंद करण्यात आल्यानंतर मास्टरमाईंड पत्रकार बाळ बोठे यास हैद्राबाद येथून ताब्यात घेण्यात आले. सध्या हे सर्व प्रमुख आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. मास्टरमाईंड बाळ बोठे याने जामीनासाठी नगरच्या सत्र न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे.

खटला मिटविण्यासाठी हालचाली सुरू जरे यांच्या हत्येच्या या पार्श्‍वभुमिवर काही व्यक्तींकडून हा खटला मिटविण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या असून त्यासाठी आपल्यावर दबावतंत्राचा वापर करण्यात येत असल्याचे रेखा जरे यांचा मुलगा रूणाल याने पोलिस अधिक्षकांकडे दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.

मध्यस्त घालून बैठक घडवून आणण्याचे प्रयत्न ! या प्रकरणात काही पत्रकार तसेच मध्यस्त व्यक्ती आपली भेट घेऊन खटला मिटविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. वेळोवेळी काही लोकांना मध्यस्त घालून बैठक घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

जिवितास धोका निर्माण त्यासाठी समोरच्या व्यक्तीकडून पैसे घेण्याचे प्रकारही सुरू आहेत. अशा परिस्थितीत आपल्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो अशी भितीही रूणाल याने या निवेदनात व्यक्त केली आहे.

या खटल्यासाठी रूणाल यांनी सचिन पटेकर या स्वतंत्र वकीलांचीही नियुक्ती केलेली असून त्यांच्यावरही दबाव आणून हे प्रकरण मिटविण्यासाठी हे लोक मागे पुढे पाहणार नाहीत अशी शंका रूणाल यांनी व्यक्त केली आहे.

आपल्याही जिवाचे काही बरे वाईट होउ शकते ज्याप्रमाणे या व्यक्तींनी आपल्या आईची जिव घेतला त्याचप्रमाणे खटला मिटविण्यासाठी आपल्याही जिवाचे काही बरे वाईट होउ शकते अशी आपणास खात्री झाल्याचे रूणाल यांचे म्हणणे आहे.

या सर्व पार्श्‍वभुमिवर आपल्या कुटूंबाची बदनामी करण्याचा डावही रचण्यात आला असून त्यासाठी उचित व्यक्तींवर योग्य ती कारवाई करणे महत्वाचे आहे. तसे न झाल्यास या खटल्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

रेखा जरे यांच्या नावावर सावेडी भागात जागा … हा खटला मिटविणारे असेही सांगू लागले आहेत की रेखा जरे यांच्या नावावर सावेडी भागात जागा असून त्याची किंमत काही कोटी रूपयांमध्ये आहे. लालसा दाखवून कागदपत्रे देतो,

खटला मागे घे अशी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे नमुद करून सबंधितांवर कारवाई करण्याची मागणी रूणाल जरे यांनी पोलिस अधिक्षकांकडे केली आहे. तपासी अधिकारी अजित पाटील यांनाही या निवेदनाची प्रत सादर करण्यात आली आहे.