अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये विनयभंगाची एक धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडमधील वाकड या भागात एका स्वीगी डिलिव्हरी बॉयने तरुणीचे रस्त्यावर चुंबन घेण्याचा प्रयत्न करत केला आहे.

या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. नुकत्याच साकीनाका प्रकरणामुळे राज्यातील वातावरण आधीच चिघळले असताना विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात अशा घटना होऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जाऊ लागले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पीडित तरुणी आज (14 सप्टेंबर) पिंपरी चिंचवडमधील एका रस्त्यावरून जात होती. मात्र, अज्ञात स्वीगी डिलिव्हरी बॉय अचानकपणे तरुणीसमोर आला.

Advertisement

तसेच जवळ येऊन त्याने तरुणीला अश्लिल शेरेबाजी केली. एवढ्यावरच न थांबता डिलिव्हरी बॉयने तरुणीला एका हाताने जवळ ओढून मिठी मारुन तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान हा प्रकार घडताच तरुणीने डिलीव्हरी बॉयविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी स्विगी डिलिव्हरी बॉयविरोधात वाकड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी तरुणाचे वय अंदाजे 20 ते 25 वर्षे असावे असे सांगण्यात येत आहे. पोलीस डिलिव्हरी बॉयचा शोध घेत असून तपास सुरु आहे.

Advertisement