अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कायम आग्रही असलेले राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या वीजप्रश्नी पाठपुरावा करून ४ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला.
त्यामुळे जिव्हाळ्याचा विषय असलेल्या विजेच्या प्रश्नातही आमदार पवारांची ‘पॉवर’ पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.
आमदार पवारांनी पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत ११ के.व्ही. दाबाच्या वीज उपकेंद्रासाठी वीज वितरण कंपनीच्या जिल्हा व तालुका स्तरावर वेळोवेळी बैठका घेतल्या.
या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील विजेचे प्रश्न सोडवण्यासाठी अगोदर स्थानिक पातळीवरच कामे निश्चित केली जातात.
कर्जत तालुक्यातील मांदळी येथील गावठाण वाहिनीच्या अलगीकरणासाठी ४३ लाख रुपये निधी मंजूर करून घेतला असून, मांदळीसह निमगाव व परिसरातील गावात गावठाण फिडरसाठी सुमारे ११ किमी लांबीची नवीन उच्चदाबाची वाहिनी कार्यान्वित करण्यात आली.
तीन नवीन रोहित्र उभारण्यात आले आहेत. यामुळे येथील नागरिकांना थ्री फेज विजेचा २४ तास पुरवठा होत आहे.
कर्जत तालुक्यातील गणेशवाडी येथील नवीन वीज उपकेंद्रासाठी केलेल्या पाठपुराव्यातून २ कोटी ७३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर होऊन हे उपकेंद्रही कार्यान्वित झाले आहे.
बाभूळगाव दुमाला येथील मोहिते वस्ती, करमनवाडी येथील खराडे वस्ती, गणेशवाडी येथील दातीर वस्ती, काळेवाडी येथील जिराफवस्ती, चिलवडी येथील नवले वस्ती, करपडी येथील मोहिते वस्ती, बारडगाव दगडी येथील घासले वस्ती,
म्हाळंगी येथील जगताप वस्ती तसेच निमगाव गांगर्डा, मांदळी व निमगाव आदी गावे व वाड्या-वस्त्यांसाठी नवीन ११ रोहित्रे मंजूर करण्यात आलेली आहेत. जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील मोरे वस्ती,
पिंपळगाव आळवा येथील बारवकर वस्ती, बांधखडक येथील चव्हाण वस्ती, तेलंगशी येथील मोरे वस्ती, जवळके येथील वाळूंजकर-कांबळे वस्ती व घोडेगाव येथील तळेकर वस्तीसाठी नवीन ६ रोहित्रे मंजूर झालेली आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम