अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या ग्रामीण रुग्णालयात जाऊन कोव्हीड-१९ प्रतिबंधात्मक लसीचा पहीला डोस घेतला.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने लसीकरण मोहीमेची व्याप्ती वाढविल्यामुळे पात्र व्यक्तींनी आत्मनिर्भरतेने लस घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
कोव्हीड-१९ संकटामुळे भयभीत झालेल्या समाज जीवनाला केव्हीड प्रतिबंधात्मक लस उत्पादनाचा मोठा दिलासा मिळाला. प्रतिबंधात्मक लस उत्पादन करणारा देश म्हणून भारताची ओळखही जगात निर्माण झाली.
आज इतर देशांना सुध्दा लस उपलब्ध करून देणारा देश म्हणून भारताचा नावलौकीक झाला असल्याकडे लक्ष वेधून आ.विखे पाटील म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी देशाच्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ, वैज्ञानिक, जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडे केलेला
पाठपुरावा आणि लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना दिलेले प्रोत्साहन तितकेच महत्त्वाचे असल्याचे आ.विखे पाटील म्हणाले.
देशातील सर्वच कोव्हीड योध्दे, जेष्ठ नागरीकांना प्रथम लस घेता यावी यासाठी शासकीय आणि खासगी रुग्णालयात लसीकरणाचा महत्वपूर्ण कार्यक्रम हाती घेण्यात आला.
केंद्र सरकारने आता ४५ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येकालाच लस देण्याच्या घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयामुळे लसीकरण मोहीमेची व्याप्ती अधिक वाढली असल्याचे आ.विखे पाटील म्हणाले.
कोव्हीड संकटावर मात करण्यासाठी सर्वानाच नियमाचे पालन करावे लागणार आहेच, परंतू उपलब्ध झालेल्या लसीचा डोस घेवून या संकटावर मात करण्याची स्वतः पासून सुरूवात करण्याचे कर्तव्यही महत्वाचे असल्याने
पात्र व्यक्तींनी प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी आत्मनिर्भरतेने पुढे येण्याचे आवाहन आ.विखे पाटील यांनी केले. शिर्डी मतदारसंघात ग्रामीण आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ठरवून दिलेल्या दिवसांप्रमाणे लसीकरण सुरू आहे.
लसीकरण मोहीमे बरोबरच कोव्हीडच्या वाढती रुग्ण संख्या अटोक्यात आणण्यासाठी आ.विखे पाटील हे महसूल आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दररोज आढावा घेवून उपाय योजना तसेच आरोग्य सुविधांबाबत सूचना देत आहेत.
यावेळी पंचायत समिती चे माजी उपसभापती सुभाष विखे, माजी उपसरपंच अनिल विखे, उपस्थितीत होते.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|