आमदार हे केवळ फोटोसेशन मध्ये व्यस्त आहेत. ते कोणताही रिझल्ट देऊ शकलेले नाही !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- केवळ सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्यतेमुळे नगर शहरातील हजारो लोकांना आज आरोग्य आणीबाणीला सामोरे जावे लागत असून, यांच्यामुळेच शहर व्हेंटिलेटरवर गेले आहे.

असा घाणघाती आरोप काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी करत मनपातील भाजप-राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांसह आमदारांवर सडकून टीका केली .

काळे म्हणाले की, विद्यमान आमदार ज्यांच्या नेतृत्वाखाली मनपामध्ये भाजप, राष्ट्रवादीची सत्ता आहे, त्यांची नागरिकांप्रती असणारी अनास्था व असंवेदनशीलतेमुळे मनपाने जबाबदारी पूर्णत: झटकली असून ही महामारी एक वर्षापासून सुरू असून देखील शहरामध्ये कोणतीही आरोग्यविषयक यंत्रणा ते उभी करू शकलेले नाहीत.

आमदार हे केवळ फोटोसेशन मध्ये व्यस्त आहेत. ते कोणताही रिझल्ट देऊ शकलेले नाहीत. जिल्हा प्रशासनावर संतापण्या ऐवजी मनपा प्रशासना कडून काम करून घेण्यासाठी पुढे यावे असा खोचक सल्ला काळे यांनी आमदारांना दिला आहे.

एका रुग्णाला खाजगी रुग्णालयामध्ये जावे लागल्यास सरासरी दीड ते दोन लाख रुपयांचा खर्च येतो. एका कुटुंबात चार सदस्य आहेत असे गृहीत धरले तरी नव्या स्ट्रेन प्रमाणे एका व्यक्तीस बाधा झाल्यास घरातील सर्व व्यक्तींना बाधा होते असे निरीक्षणात आले आहे.

त्यामुळे एका कुटुंबाचा खाजगी रुग्णालयातील खर्च हा साधारणत: सहा ते आठ लाख रुपयांच्या घरात जातो आहे.

लॉकडाऊन मुळे रोजगार बंद असताना सर्वसामान्य नागरिक, गोरगरीबांना हा खर्च कोणत्याही परिस्थितीमध्ये परवडणारा नाही.

प्रत्येक नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये एवढा मोठा खर्च करून आरोग्य सुविधा मिळवू शकत नाही. असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe