अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आपली बनावट ऑडिओ क्लिप तयार करुन सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी पारनेर मनसेच्या पदाधिकाऱ्याला १ कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस दिली.
अविनाश फवार असं या मनसे पदाधिकाऱ्याचं नाव आहे. दरम्यान लंके यांच्या नोटीसला आता मनसेने देखील उत्तर दिलं आहे. निलेश लंकेंच्या ४ पानांच्या नोटीशीला मनसेने १० पानांच्या नोटीशीने उत्तर दिल्याची माहिती समोर आली आहे.
बेकायदेशीर नोटीसला कायदेशीर उत्तर दिल्याचं ट्विट मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी केलं आहे. दरम्यान सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी आमदार लंके यांनी पारनेर मनसेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहेत.
आमदार लंके यांनी वकिलांमार्फत पाठवलेल्या या नोटीसमध्ये अविनाश पवार यांच्याकडे बदनामी पोटी १ कोटी रुपये आणि नोटीस खर्च ५ हजार असे एकूण १ कोटी ५ हजार रुपये देऊन माफी मागण्याची मागणी करण्यात आली होती.
दरम्यान मनसेच्या पदाधिकाऱ्याला कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर आता मनसेने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. अखिल चित्रे यांनी ट्विट करत निलेश लंके यांना इशारा दिला होता. अब्रुनुकसानीची नोटीस आहे, कि खंडणीसाठीचं पत्र,
असा सवाल उपस्थित करत आपल्या या बेकायदेशीर नोटीसला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ, असं अखिल चित्रे यांनी म्हटलं होतं.
तसेच निलेश लंके ही लढाई आपण सुरु केली, पण ही लढाई आम्हीच संपवणार हे निश्चित, असं अखिल चित्रे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज मनसेने देखील निलेश लंके यांनी पाठवलेल्या नोटीसला उत्तर दिल्यानं राजकारण चांगलचं तापणार असल्याचं दिसून येत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम