अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक वैतागले आहे. दरम्यान लॉकडाऊन अद्यापही कायम असल्याने सर्वसामान्य नागरिक मोठा आर्थिक संकटात सापडला आहे.
संपूर्ण कडक पद्धतीने लॉकडाऊन लावून सामान्य नागरिकांचा छळ प्रशासनाकडून सूरू आहे, असे प्रतिपादन मनसेचे नितीन भुतारे यांनी केले. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, कुठल्याही प्रकारची मदत राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांना केली नाही.
जिल्ह्यात व शहरात दररोज एक नविन आदेश जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त काढत आहेत. कडक निर्बंध लादल्यामुळे आधीच सर्वसामान्य नागरिकांकडे पैसे नसतांना हजारो रूपये दंड करून लोकांचे खिसे रिकामे करण्याचे काम जिल्हा व महानगरपालिका प्रशासन करत आहेत.
त्यामुळे आर्थिक कंबरडे मोडलेल्या लोकांना आधार देण्याचे सोडुन त्यांच्यावर घाव घालण्याचे प्रकार प्रशासन करत आहे. जिल्हाधिकारी व आयुक्तांना शासनाचा पगार चालु असल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे होणारे हाल समजत नाही.
त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा जसा आर्थिक पुरवठा आपण बंद केला तसाच जिल्हाधिकारी व आयुक्त तसेच यांच्या बरोबर असणारे सर्व अधिकारी यांचे पगार लॉकडाऊन काळात बंद करावे. अशी मागणी मनसेच नितीन भुतारे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देऊन केली केली आहे.
तसेच लवकरात लवकर सर्व अहमदनगर जिल्हा व शहरांतील बाजारपेठा छोटे मोठे दुकाने उघडावित. लॉकडाऊनमुळे बंद असलेला व्यापार पूर्वपदावर आणून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी विनंती देखील नितीन भुतारे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देऊन केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम