अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दारात सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.
दरम्यान इंधनाच्या दरवाढीच्या विरोधात मनसे पारनेर तालुका शाखा एक आगळेवेगळे आंदोलन करणार आहे. दरवाढीच्या निषेधार्थ मनसे गावात लाडू वाटप करून दरवाढ आणि भाजप सरकारचा निषेध करणार आहे.
दरवाढ व भाजप सरकार विरोधात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मारुती रोहोकले यांच्या नेतृत्वाखाली येत्या गुरुवारी (१८ फेब्रुवारी) रोजी भाळवणी येथे नागेश्वर मंदिर देवस्थान ते भाळवणी बस स्टॉप तसेच बाजार परिसरात लाडू वाटप करण्यात येणार आहे.
फटाके वाजवून पेट्रोलच्या दराने शंभरी पूर्ण केल्यामुळे उपरोधिकपणे शतकपूर्तीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ‘सध्या महाराष्ट्र राज्य आणि देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ दिवसागणिक प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे.
या दरवाढीमुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यात सर्वसामान्य माणूस होरपळला जात आहे. देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात अनेक आंदोलने सुरू आहेत. आम्ही याचा वेगळ्या पद्धतीने निषेध करण्यात येणार आहोत.
लोकांना दरवाढीची जाणीव करून देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. मनसेतर्फे आम्ही तालुक्यात नेहमी वेगळ्या प्रकारची आंदोलने करतो. त्याचप्रमाणे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हे लाडू वाटप आंदोलन करण्यात येणार आहे.’
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved