मोदींनी ‘मन की बात’ केली, पण कामाचे बोललेच नाहीत’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- झारखंडमध्ये कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत स्वत:ची ‘मन की बात’ ऐकवली;

पण मोदी कामाचे काहीच बोलले नाहीत, असा टीकात्मक सूर राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी शुक्रवारी आळवला. त्यानंतर भाजपचे नेते व मंत्र्यांनी हेमंत सोरेन यांच्यावर जोरदार पलटवार केला.

त्यामुळे कोरोना महामारी व्यवस्थापनावरून पुन्हा राजकारण सुरू झाले आहे. देशात कोरोना महामारीवरून भीषण स्थिती निर्माण झाली आहे.

अनेक राज्यांत ऑक्सिजन तथा औषधींचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशावेळी केंद्र सरकार सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप बिगरभाजप शासित राज्ये करत आहेत.

या घटनाक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासोबत वार्तालाप केला. यावेळी झालेल्या चर्चेवरून वादंग निर्माण झाले आहे.

हेमंत सोरेन ट्विटरवरून म्हणाले की, आपल्या सोबतच्या चर्चेत मोदींनी केवळ स्वत:ची ‘मन की बात’ ऐकवली. जर त्यांनी आमचे म्हणणे ऐकून कामाचे बोलले असते तर अधिक बरे झाले असते.

प्राणघातक कोरोना महामारीवर पुन्हा एकदा मात केली जाईल, तसेच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर तथा इतर वैद्यकीय साधनसामग्रीचा तुटवडा दूर केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे;

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe