Modi Government : गुड न्यूज ! नवीन वर्षांपूर्वी सरकारचा मोठा निर्णय ! आता ‘या’ लोकांना मिळणार जास्त पैसे ; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Published on -

Modi Government : महागाईच्या काळात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत नवीन वर्षांपूर्वी सर्वसामान्यांना एक मोठा दिलासा दिला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो केंद्र सरकार २०२३ पूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार आता छोट्या बचत योजनांचे व्याजदर वाढवण्यात आले आहे. ही दरवाढ जानेवारी-मार्च तिमाहीसाठी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 1 वर्षाच्या योजनेवरील व्याजदर 6.6% पर्यंत वाढवण्यात आला आहे.

तर 2 वर्षांच्या योजनेवर 6.8% दराने व्याज मिळेल. 3 वर्षांच्या योजनेवरील व्याजदर 6.9% पर्यंत वाढला आहे. त्याच वेळी, 5 वर्षांच्या योजनेवर 7% दराने व्याज उपलब्ध असेल. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदर आता 8% आहे. मासिक उत्पन्न योजनेवरील व्याजदर 7.1% पर्यंत वाढला आहे.

याशिवाय किसान विकास पत्रावर आता 7.2 टक्के दराने व्याज मिळेल. त्याच वेळी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर 7% पर्यंत वाढविण्यात आला आहे. यामुळे आता सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे पण वाचा :- Upcoming Cars : प्रतीक्षा संपली ! नवीन वर्षात ‘ह्या’ कार्स मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ; लिस्ट पाहून व्हाल तुम्ही थक्क

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News