महाराष्ट्रातील आघाडी सरकार पाडण्यासाठी मोदी-शहा यांच्या हालचाली

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- महाराष्ट्रातील आघाडी सरकार पाडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हालचाली सुरु आहेत.

आघाडी सरकार पाडून तिथे भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात हे दोघे आहेत, असा खळबळजनक आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.

ते म्हणाले की, मोदी-शहा या जोडगोळीने या पूर्वीही अनेक राज्यात सत्तांतर घडवून आणले आहे. यासाठी त्यांनी पेगॅससची मदत घेतली. मोदी शहानी कर्नाटकमधील जनता दल सेक्युलर व काँग्रेस आघाडीचे सरकार पेगॅससद्वारे हेरगिरी करून पाडले.

त्यानंतर मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार या दोघांनी उलथवून तिथे भाजपचे सरकार स्थापन केले. आता या दोघांची नजर महाराष्ट्रावर असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील नेत्यांवर पेगॅससद्वारे पाळत ठेवण्यात येत आहे का, याची मला कल्पना नाही.

मोदी व शहा पेगॅससची मदत आता घेतात का, हेही मला माहीत नाही. मात्र कर्नाटक, मध्य प्रदेशात जे घडले, तो महाराष्ट्रासाठी इशारा आहे.

ते म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजप नेते व घटनात्मक पदांवर विराजमान असलेल्या लोकांच्या सध्याच्या हालचाली पाहिल्यानंतर लक्षात येते की, त्यांचे इरादे चांगले नाहीत , असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe