“मोहित कंबोज यांच्या गाडीत हॉकी स्टीक्स आणि मोठ्या प्रमाणात हत्यारं होती”

मुंबई : मातोश्रीबाहेर (Matoshree) हनुमान चालीसा पठण करण्याचे रवी राणा (Ravi Rana) आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांनी ठरवल्यानंतर शिवसैनिक (Shiv Sainik) काल रात्रीपासून चांगलेच आक्रमक झाले आहेत. मातोश्रीबाहेर शिवसैनिक पहारा देऊन बसले आहेत. मात्र रात्री मातोश्रीबाहेर वेगळाच प्रकार घडला आहे.

भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) हे मातोश्रीबाहेरून जात असताना काही शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. त्यानंतर शिवसेना (Shivsena) नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी यावर प्रतिक्रिया देत सनसनाटी आरोप केले आहेत.

विनायक राऊत म्हणाले, मोहित कंबोज यांच्या गाडीत हॉकी स्टीक्स आणि मोठ्या प्रमाणात हत्यारं होती असा आरोप त्यांनी केला आहे. कंबोज यांच्या गादीवर झालेल्या हल्यात कोणीही जखमी झालेले नाही.

मोहित कंबोज यांच्या गाडीचा आरसा आणि दाराचा हॅन्डल शिवसैनिकांकडून तोडण्यात आला आहे. मोहित कंबोज हे रेकी करण्यासाठी आले होते असा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे.

या हल्ल्यानंतर मोहित कंबोज यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, एका पत्रकार मित्राच्या लग्नात मी गेलो होतो अशी प्रतिक्रिया देत रेकी करण्यासाठी गेल्याचा आरोप कंबोज यांनी फेटाळून लावला आहे.

रवी राणा आणि नवनीत राणा हे त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहेत. मात्र शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राणा दाम्पत्य काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.