‘या’ तालुक्यात सावकार जोमात…? एका बेकायदेशीर सावकारा विरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- सावकारकी करणे तसे बेकायदेशीरच. परंतु त्यात देखील अनेकजण असे व्याजाने पैसे देऊन अवाच्या सव्वा दराने व्याज घेवून सर्वसामान्य माणसाचा प्रचंड छळ करत मारहाण देखील करत असल्याचा प्रकार कर्जत तालुक्यात समोर आला आहे.

या प्रकरणी अमृत किसन भिताडे याच्याविरुद्ध कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रमेश ज्ञानदेव मोढळे (रा. देशमुखवाडी, ता. कर्जत) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

अमृत भिताडे याच्याकडे कुठल्याही प्रकारचा सावकारकीचा परवाना नसताना त्याने ११ लाखाची रक्कम ६ टक्के व्याजदराने तसेच २ लाख रुपये महिना ४ रुपये व्याजदराने फिर्यादीस दिले. फिर्यादीकडुन २८ लाख ८६ हजार रुपयांचे व्याज घेतले.

तसेच १३ लाखाच्या मुद्दल रकमेवर व्याजाचे पैसे राहिले म्हणून फिर्यादीकडील चारचाकी ट्रॉली बळजबरीने नेली, फिर्यादीस मारहाण करण्यात आली. फिर्यादीकडील ५ तोळे सोन्याचे गंठण पतसंस्थेतून सोडवून देतो असे म्हणून ते सोने स्वत: घेवून गेला.

फिर्यादीस व्याजाच्या पैशापोटी गाया विकायला लावून पैसे घेतले. अशा प्रकारची फिर्यादी रमेश मोढळे यांनी दिली. त्यानुसार अमृत किसन भिताडे याच्याविरुद्ध कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe