अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- तोक्ते चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीला धडकल्यानंतर सर्वजण मान्सूनच्या प्रतीक्षेत होते. अनेक जणांनी मान्सूनच्या आगमनाला उशीरा होईल, अशी चिंता व्यक्त केली होती.
पण दक्षिण-पश्चिम मान्सून अंदमान-निकोबार येथे दाखल झाला आहे, अशी माहिती भारतीय मौसम विज्ञान विभाग दिली आहे. त्यामुळे लवकरच मुख्य भूभागात मान्सून पोहोचण्याचे संकेत दिले आहेत.
‘ह्या’ ठिकाणी मान्सून आला :- आयएमडीने सांगितले की, २१ मे रोजी नैऋत्य मान्सून बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात, निकोबार बेटे, संपूर्ण दक्षिण अंदमान समुद्र आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात दक्षिण पश्चिम मान्सून आला आहे.
१ जूनला केरळमध्ये मान्सून दाखल होणार असा अंदाज काही दिवसांपूर्वी आयएमडीने वर्तवला होता. पण आता अंदमान-निकोबारमध्ये मान्सून पोहोचला असल्यामुळे केरळमध्ये मान्सून १ जून अगोदरच म्हणजेच ३१ मे दाखल होण्याचा अंदाज आता आयएमडीने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाचा हा अंदाज खरा :- नैऋत्य मोसमी वाऱ्यांना भारतीय उपखंडात मान्सून म्हटलं जातं. भारतीय हवामान विभागानं हे वारे 1 जूनला केरळमधील दाखल होतील, असा अंदाज वर्तवला आहे. सध्या हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 21 मे रोजी नैऋत्य मोसमी वारे हे अंदमान बेटांवर पोहोचतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला.
15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र :- यंदा मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळात मान्सून दाखल होईल.तर 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.
महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होण्याचा अंदाज :- भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर पडला होता. मात्र यंदा अशी कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे केरळात जर मान्सून वेळेवर दाखल झाला तर महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम