श्रीगोंद्यात मृत्यू जास्त मात्र नोंद कमी; प्रशासनाच्या नोंदी संशयाच्या भोवऱ्यात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची प्रत्यक्ष संख्या अधिक असतानाही प्रशासनाची आकडेवारी मात्र कमी आहे.

मृत्यू दडविले जात आहेत, की प्रशासनाचा हलगर्जीपणा होतोय, असा संशय नागरिकांकडून केला जातो आहे. यातच श्रीगोंदे तालुक्यात मागील दोन महिन्यांत अनेकांचे बळी कोरोनाने घेतले आहेत.

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तेरा महिन्यांत कोरोनामुळे तालुक्‍यात 163 जण दगावले आहेत. तालुक्‍यातील 115पैकी 52 गावांतच कोरोनाने मृत्यू झाल्याचा दावा प्रशासन करीत आहे.

त्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. तालुक्‍यात कोरोना महामारीने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रुग्णसंख्या जशी वाढतेय, तसा मृत्यूदरही वाढल्याने, सामान्यांवर कोरोनाची दहशत वाढत आहे.

कोरोनामुळे जे मृत्यू होत आहेत, त्यांची नोंद ठेवण्याची जबाबदारी आरोग्य विभाग, ग्रामपंचायत व नगरपालिका यांची असल्याचे सांगण्यात आले.

प्रत्यक्षात ही नोंद केवळ आरोग्य विभागच ठेवत आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अनेकांची नोंद मृत्यू-नोंदवहीत नसल्याची धक्कादायक माहिती आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe