अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-राज्यातील कोरोना रुग्णवाढ आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी तसेच सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
निर्बंध असूनही राज्यातील बुलडाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशीम,
बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद या 15 जिल्ह्यांमध्ये अजूनही मृत्यूदर अधिक असून तो कसा कमी करता येईल याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
परिस्थितीनुसार अधिकाधिक टेस्ट, ट्रेसिंग करण्यावर भर देण्यात यावा, गर्दी होणार नाही याची काळजी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. टेस्टची संख्या कमी केल्याने अनेकदा रुग्णवाढीला ब्रेक लागल्याचे दिसते.
गडचिरोली, अमरावती जिल्ह्यातील आदिवासी भागातील वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याच्या सूचना थोरात यांनी केल्या.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम