अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- घरात सासू-सुनेचे भांडण हा प्रकार तास काही नवीन नाही. सासू अन सुनेचे भांडण नाही असे घर मिळने तसे फारच दुर्मिळ आहे. यातील काहींचे वाद ठराविक काळानंतर संपुष्ठात येतात.
मात्र काहींचे वाद कधी कधी खूप मोठ्या वादाला किंवा संकटाला कारणीभूत ठरतात. सासू सुनेच्या वादातून एक आणि धक्कादायक विशेष म्हणजे मातृत्वालाच लाजवणारी घटना नागपुरात घडली आहे.
त्याचे झाले असे काही किरकोळ कारणावरून सासू-सुनेचे वाद झाले मात्र या दोघीचे वाद एका चिमुकल्याच्या जीवावर बेतणाले असते.
सासूसोबत झालेल्या वादामुळे संतापलेल्या सुनेने तिच्या स्वतःच्या अवघ्या ७ महिन्याच्या बाळाला जबर मारहाण केली. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नागपुरातील अंबाझरी परिसरातील ही घटना घडली आहे. राग अनावर झाल्यामुळे आईनेच अवघ्या काही महिन्यांपूर्वी जन्मलेल्या पोटच्या बाळालाच मारहाण केल्याच्या
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सर्वात आधी बाळाला त्या महिलेकडून ताब्यात घेतले, त्यानंतर पोलीस आणि एनजीओच्या मदतीने या महिलेचे समुपदेशन करून नंतर त्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम