Motorola G73 5G ; आजकाल जवळपास सर्वच कामे ही फोनवरच केली जातात. त्यामुळे ग्राहकांची गरज लक्षात घेता स्मार्टफोन कंपन्या त्यांच्या उपकरणांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त शक्तिशाली फीचर्स देत आहेत. इतकेच नाही तर, वेगवान चार्जिंग तंत्रज्ञान मिळत असून आता बजेट स्मार्टफोनमध्येही मजबूत बॅटरी दिल्या जात आहेत.
अशातच दिग्ग्ज टेक कंपनी मोटो आपला नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा हा आगामी फोन 5G असणार आहे. Motorola च्या नवीन 5G फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि मजबूत बॅटरी असणार आहे, तसेच डिस्प्ले देखील उत्तम देण्यात येणार आहे.

फीचर आणि स्पेसिफिकेशन
कंपनी आपल्या नवीन फोनमध्ये 6.5-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देत असून जो 120Hz च्या रिफ्रेश दर आणि 20:9 च्या आस्पेक्ट रेशोला सपोर्ट करत आहे. स्टोरेजचा विचार केला तर कंपनी या फोनमध्ये 8 GB रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. तसेच यात MediaTek Dimensity 930 चिपसेट देत असून फोटोग्राफीसाठी यात एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे मिळणार आहेत.
यात, 50-मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेरासह 8-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. या फोनच्या पुढच्या बाजूस 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देत आहे. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचरसह सुसज्ज असणाऱ्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. जी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
कनेक्टिव्हिटीचा विचार केला तर फोनमध्ये 12 5G बँड्सशिवाय ब्लूटूथ 5.3 आणि USB टाइप C 2.0 सारखे पर्याय देण्यात आले आहेत. यूकेमध्ये फोनची किंमत 310 पौंड (जवळपास 30 हजार रुपये) आहे. त्यामुळे, भारतात त्याची किंमत सुमारे 20,000 रुपये असण्याची शक्यता आहे.