अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, केरळ, तामिळनाडू आणि छत्तीसगड या 8 राज्यात दैनंदिन रुग्णांची मोठ्या संख्येने नोंद होत आहे.
नव्या रुग्णांपैकी 84.5 टक्के रुग्ण या आठ राज्यात आहेत. गेल्या 24 तासात 68,020 नव्या रुग्णांची नोंद झाली.
महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 40,414 नव्या रुग्णांची नोंद झाली. कर्नाटकमध्ये 3,082 तर पंजाबमध्ये 2,870 नव्या रुग्णांची नोंद झाली.
भारतात आज एकूण सक्रीय रुग्णसंख्या 5,21,808 आहे. भारतातली सध्याची सक्रीय रुग्ण संख्या ही एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 4.33 टक्के आहे. देशात कोविड प्रतिबंधक लसीच्या 6 कोटीपेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार भारतात 9,92,483 सत्राद्वारे 6.05 कोटीहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
भारतात 1,13,55,993 कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 94.32 टक्के आहे. गेल्या 24 तासात 32,231 रुग्ण कोरोनातून बरे झाले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|