खासदार उदयनराजे भोसले यांना कोरोनाची बाधा; ‘या’ ठिकाणी घेतायत उपचार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :-भाजपाचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयराजे भोसले यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उदयनराजे यांच्यावर गेल्या ४ दिवसांपासून उपचार सुरु आहेत.

दिल्लीतून परतल्यानंतर खासदार उदयनराजेंना कोरोनाची लागण झाली. खासदार उदयनराजे यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले या सुरुवातीला करोनाबाधित झाल्या होत्या.

त्या बऱ्या झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र पुन्हा त्यांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मातोश्री कल्पनाराजेंना रुग्णालयात दाखल केल्याचे समजल्याने खासदार उदयनराजे दिल्लीहून अधिवेशन सोडून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पुण्यात आले होते.

यावेळी संपर्कात आल्यामुळे त्यांनाही त्रास होऊ लागला होता व काही लक्षण आढळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आत्ता त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे जवळच्या सूत्रांनी सांगितले.

तसेच, पुढील एक दोन दिवसात त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल असे देखील त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. तर त्यांच्या मातोश्रींनाही घरी सोडण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe