खासदार विखे आक्रमक,म्हणाले जिल्हा बँक हा तर फक्त ट्रेलर होता….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत जामखेड बिनविरोध काढले तर कर्जतच्या निवडणुकीत त्यांनी ४५ ठराव असलेले घेऊन गेले पण मतमोजणीत ३६ कसे झाले हे कोडे त्यांना अजून उमजेना म्हणून जिल्हा बँक ट्रेलर आहे तर नगरपरिषदेचा पिक्चर दाखवयाचा आहे.

असा टोला खासदार सुजय विखे पाटील यांनी आमदार रोहीत पवार यांचे नाव न घेता लगावला. जामखेडमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा स्नेहमेळाव्यात खा.डॉ सुजय विखे पाटील बोलत होते. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६० वर्षावरील नागरिकांना मोफत लस देत आहेत.

जगात मोफत लस देणारा भारत हा एकमेव देश आहे. जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा यासाठी प्रत्येकाने घरोघर जाऊन त्यांना लसीचे महत्त्व सांगून लसीकरण करण्यास कटीबध्द करा. राज्यातील जेवढे खासदार आहेत त्यांच्यापेक्षा जास्त निधी मी केंद्र सरकारकडून दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी आणला आहे,

पण प्रसिद्धी केली नाही परंतु येथील आमदार हा निधी मीच आणला असे सोशल मिडियावर सांगत आहेत. जे काम आपण आनले नाही त्याचे श्रेय घेऊ नये, याबाबत मी जनतेत जाऊन निधी आणल्याचे सांगणार आहे. जिल्ह्यात ५० वर्षापासून विखे घराणे हे सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे व संघर्ष करण्यासाठी साथ देत आहेत.

जर विखे घराणे राजकीयदृष्ट्या संपले तर सामान्य लोकांना न्याय मिळणार नाही. तालुक्यात आ. रोहीत पवार हे दबावाचे व धाक दडपशाही चे राजकारण करीत आहेत.

याची मला जाणीव आहे. पण त्यासाठी त्यांना उत्तर देण्यासाठी निवडणूक होणे गरजेचे होते. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून आम्ही ते त्यांना दाखवून दिले आहे. त्यांनी मागील वर्षभरात एकही काम केले नाही माजी मंत्री राम शिंदे यांनी केलेल्या कामाचे उद्घाटन ते करीत आहेत.अशी टीका केली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe