कोरोना काळात दक्षिणेत काही लोकप्रतिधींनी फ्लेक्स छापून स्वत:चा मोठेपणा केला खासदार विखे यांची टीका  

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :-  कोविडच्या काळात सर्वात जास्त काम करणारे बाजुला राहीले पण काहींनी आपले फ्लेक्स बोर्डवर फोटो छापून दक्षिणेत काही लोकप्रतिधींनी स्वत:चा मोठेपणा केला तो कशासाठी, याचा सामान्य जनतेने विचार करण्याची गरज आहे.

मी खासदार झाल्यानंतर माझ्या बरोबर सर्व पक्षातील कार्यकर्ते आहेत, आपण चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला विकास कामे करण्यासाठी निवडून दिले. पण राज्यात स्वत:च्या स्वार्थासाठी एकत्र आलेले आज सत्तेत बसलेले आहेत, त्यांना विकासाचे काही देघेणेनाही.

असा घणाघाती आरोप खासदार डॉ.सुजय विखे यांनी केला. श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे खा. विखे बोलत होते. ते म्हणाले की, अनेक ठिकाणी रस्त्याची कामे चालू आहेत, परंतु स्थानिक पुढाऱ्यांच्या टक्केवारीमुळे रस्त्याचा दर्जा खराब होवून काम निकृष्ट झाली आहेत.

काही पुढारी कामात पाच टक्के मागतात जिल्हा परिषदेत तर आता दहा टक्के घेतल्याशिवाय कामे होत नाहीत. आम्ही सत्तेवर असताना असे झाले नाही. याचा खुलासा पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत करणार आहे.

म्हणून दक्षिणेत चांगले सुशिक्षित लोकप्रतिधी निवडून द्या, टक्केवारी, वाळू, स्क्रॅप, खंडणी, जमा करणारे प्रतिनिधी नको, असे म्हणत खा.विखेंनी नाव न घेता आमदार लंकेवर निशाणा साधला.

दोन वर्षानंतर नगर जिल्हा कसा असेल पहा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी व रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात रस्त्याचे जाळे तयार करुन विकास काय असतो हे जनतेला दाखविणार आहे.

चांगल्या माणसाची निवड करावी लागते मग विकास दिसतो. जनतेनी विकास करणारी लोकप्रतिनिधी निवडून दिले पण खरे बाजुला राहिले आणि राज्यात स्वत:च्या स्वार्थासाठी एकत्र येवून सत्तत बसलेत त्यांचा विकास कुठे दिसत नाही. याची दखल घेण्याची गरज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe