एमपीएससीच्या परीक्षा रद्द : सरकारला घराचा आहेर!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या महिन्यात होणारी एमपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले आहे.

तांबे यांनी याबाबत त्यांनी ट्वीटरव्दारे सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की,’ एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे.त्याचा मी जाहीर निषेध करतो.

कोरोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पध्दतीने अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे ? ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहीजे.

तर दुसरीकडे सरकारच्या या निर्णयाचा विद्यार्थ्यांनी निषेध केला आहे. सध्या राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या महिन्यात होणारी एमपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

ही परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती. ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.

या निषेधार्थ त्यांनी आंदोलन सुरु केले आहे. पुण्यातील नवी पेठे येथे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe