वीज चोरांविरोधात महावितरण आक्रमक; कारवाईची मोहीम घेतली हाती

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- काही दिवसापासून महावितरणने राज्यात थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली होती. थकबाकीअभावी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाणी योजना तसेच स्ट्रीट लाईटची वीज खंडित केल्याची कारवाई देखील करण्यात आली आहे.

यातच आता वीजचोरी करणाऱ्या विरोधात महावितरणणे आक्रमक भूमिका अंगिकारली आहे. राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे येथील भांबारे वस्ती परिसरात महावितरण पथकाने वीज चोरी आटोक्यात आणण्यासाठी चोरून वीज वापरणार्‍या ग्राहकांना पकडण्यात आले असून पंचनामा करण्यात आला आहे.

याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले कि, वीज चोरी करणे कायद्याने गुन्हा असून महावितरणकडून ग्राहकांना अल्प दरात वीज पुरवली जाते.

तरी ग्राहक मीटरमधून वीज बायपास करणे, झाडावरून केबल टाकून वीज चोरी करणे अशा प्रकारे वीज वापर करताना वायर कट झाल्यास पावसाळ्यात झाडामध्ये वीज प्रवाह उतरल्याने अनावधानाने जिवीत हानी होऊ शकते.

दरम्यान नुकतेच महावितरणच्या पथकाने वीजचोरी करणाऱ्यांविरोधात कारवाई करताना वीज ग्राहकांकडून केबल, हिटर, मोटर स्टार्टर असे साहित्य जप्त करण्यात आले.

ही चोरी करताना पकडण्यात आलेल्या ग्राहकांनी 48 तासांच्या आत महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून बिलापोटी ठरवून दिलेली रक्कम भरावी अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News