महावितरणचा हॉटेलमालकाला ‘शॉक’ : 7 लाखांची वीजचोरी केल्याचा गुन्हा दाखल!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021 :- हॉटेलच्या मालकाने वीजमिटरमध्ये हेराफेरी करून वीजचोरी केली. मात्र महवितरणच्या पथकाने हेराफेरी पकडली असून त्या हॉटेलमालकावर तब्बल ६ लाख ९० हजारांची वीज चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना नगर तालुक्यातील खोसपुरी शिवारातील ‘हॉटेल तंदुरी चाय लीलीयम पार्क’मध्ये घडली. 

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संदीप जरे आणि भारत शेटे या दोघांविरोधात वीज चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. महावितरणचे अतिरीक्त कार्यकारी अभियंता प्रदीप सावंत यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

अतिरीक्त कार्यकारी अभियंता सावंत, सहायक अभियंता गफ्फार मेहताब शेख, कनिष्ठ अभियंता आशिष नावकार, सहायक सुरक्षा अधिकारी शशीकुमार तांबे, तंत्रज्ञ यशवंत वेदपाठक या पथकाने ‘हॉटेल तंदुरी चाय लीलीयम पार्क’ मधील व्यवसायिक वीज मीटरची तपासणी केली होती.

तेव्हा ते मीटर हाताळलेले दिसले. मीटरच्या उजव्या बाजूला छोटे छिद्र पाडण्यात आल्याचे दिसून आले. त्यानंतर डिस्प्ले आणि टोंगरटेस्ट वरील करंटमध्ये तफावत दिसली. पथकाने अधिक तपासणीसाठी वीज मीटर ताब्यात घेतले. त्यासाठी आवश्यक ती कायदेशीर पूर्तता करण्यात आली अहमदनगर येथील कक्ष चाचणीत मीटर तापसण्यात आले.

येथे मीटरची बारकाईने तपासणी केल्यावर मीटरमधील सीटीच्या ‘आर-फेज’ आणि ‘वाय-फेज’ची लाल रंगाची वायर तोडलेली दिसली. वीज वापराची नोंद वीज मीटरमध्ये कमी व्हावी, यासाठी ही कायमस्वरूपी व्यवस्था करून वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले.

या व्यावसायिकाने दोन वर्षांच्या कालावधीत महावितरण कंपनीचे ३७ हजार, १८० युनिटची वीज चोरी केली. त्याचे बिल सहा लाख, ९० हजार रुपये होते. यानुसार महावितरणच्या अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी संदीप जरे आणि भारत शेटे या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb

अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe