महावितरणच्या वीजतारांमुळे शेतकऱ्याचा ऊस जाळून खाक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-गेली वर्षभर सुरू असलेल्या करोनाच्या संकटामुळे व सलग दोन वर्षाच्या अवकाळी व गारपिटीने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

यातच महावितरणच्या चुकीमुळे शेतकऱ्याचा ऊस जाळून खाक झाला आहे. कोरोना सारख्या परिस्थितीत शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

पाथर्डी तालुक्यातील पारेवाडी येथील विक्रम बापूराव काकडे व भिमराज बाबुराव काकडे या दोन शेतकऱ्यांच्या शेतातील विजजोड असलेल्या तारांचा झोळ वीज वितरण कंपनीने कमी न केल्यामुळे ऊस जळून खाक झाला.

ऊसाबरोबरच ऊसामधील ठिबक, पाइप तसेच आंब्याची चार झाडे सुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. मागील वर्षी सुद्धा याच कारणामुळे ऊसाला आग लागली होती.

तेव्हापासून संबंधित वीज कर्मचारी यांना विजतारांचा झोळ कमी करण्याबाबत वारंवार भ्रमणध्वनीद्वारे विनंती केली होती. परंतु त्याची दखल त्यांनी घेतली नाही.

वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे दोन्ही शेतकऱ्यांचे मिळून अंदाजे साडेतीन लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe