अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- जिल्ह्यात सर्वत्र महावितरणने थकबाकी वसुली मोहीम सुरु केली आहे. यातच पारनेर तालुक्यात वीजबिल वसुली मोहीम सुरु झाली आहे. महावितरणने येथील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
यामुळे उभी पिके जळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. सुपा परिसरातील वीज बिलाची थकबाकी भरण्यासाठी रोहित्रच बंद केले आहेत.
त्यामुळे शेतातील उभी पिके जळू लागली आहेत. लाईट बिल भरल्याशिवाय विद्युत पुरवठा केला जाणार नाही, पीक काढणीसाठी येत असताना महावितरणकडून सुरु असलेला हा आडमुठेपणा बळीराजासह पिकांना घातक ठरत आहे.
सध्याच्या स्थितीला बाजारात कांदा चाळीस रुपये किलोने विकला जात असताना इकडे शेतकर्यांचे कांदा पीक शेवटच्या टप्प्यात असताना लाईट बंद केल्याने ऐन पीक वाढीच्या काळात पाण्यावाचून पिके जळू लागली आहेत.
उन्हाळी फळ पिके, कलिंगड, खरबूज, काकडी या पिकांना या वाढीच्या काळात दिवसाआड पाणी अपेक्षित असते; परंतु आठ दिवसांपासून लाईट नसल्याने पिके वाया जाऊ लागली आहे.
दरम्यान वीज मंडळ सक्तीच्या वसुलीसाठी आठ-आठ दिवस लाईट बंद करून शेतकर्यांवर अन्याय करत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|