MSRTC Recruitment : 10वी-12वी उत्तीर्ण असाल तर एसटी महामंडळात आहे नोकरीची मोठी संधी

महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर सध्या विविध विभागांसोबतच आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी महामंडळामध्ये दहावी, बारावी आणि आयटीआय उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे

Ajay Patil
Updated:
msrtc recruitment

MSRTC Recruitment:- महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत सध्या भरतीच्या नोटिफिकेशन काढल्या जात असून वेगवेगळ्या विभागा अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.इतकेच नाही तर केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील आता रेल्वे, बँकिंग क्षेत्र व त्यासोबतच संरक्षण दलाशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या भरती प्रक्रिया सध्या राबवण्यात येणार असून काही भरती प्रक्रियांसाठीच्या अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे.

त्यामुळे वेगवेगळ्या भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक नोकरी मिळवण्यासाठी सुवर्णसंधीचा कालावधी आहे. याचप्रमाणे जर आपण महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर सध्या विविध विभागांसोबतच आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी महामंडळामध्ये दहावी, बारावी आणि आयटीआय उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे

विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेल्या महाराष्ट्र युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि नावीन्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेचा लाभ इच्छुक व पात्र उमेदवारांनी घेणे गरजेचे आहे.

 एसटी महामंडळामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि नावीन्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी महामंडळामध्ये विविध रिक्त पदा अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून या भरतीसाठी दहावी तसेच बारावी आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. विशेष म्हणजे या भरतीची जाहिरात देखील प्रकाशित करण्यात आलेली असून इच्छुक व पात्र उमेदवार या भरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.

 या पदांसाठी होणारी भरती

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेतून लिपिक, सहाय्यक तसेच शिपाई या पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून 68 रिक्त पदांसाठी ही भरती केली जात आहे.

 अर्ज करण्यासाठी आवश्यक वयोमर्यादा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाच्या माध्यमातून लिपिक तसेच सहाय्यक व शिपाई पदाच्या 68 जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले असून या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे किमान 18 ते 35 दरम्यान असणे गरजेचे आहे. इतकेच नाही तर उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. यामध्ये लक्षात घेण्याची बाब अशी आहे की ही भरती कंत्राटी पदांसाठी केली जात आहे.

 निवड झाल्यानंतर किती मिळेल पगार कुठे करावी लागेल नोकरी?

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात महाराष्ट्र युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि नावीन्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही भरती प्रामुख्याने लिपीक तसेच सहाय्यक व शिपाई पदांसाठी राबवण्यात येत आहे व यामध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना मासिक सहा हजारापासून ते दहा हजार रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे.

तसेच निवड झालेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार वेतन मिळणार आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत ज्या रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड होईल त्यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ विभाग, विभागीय कार्यालयात नोकरी करावी लागणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील त्यांनी या भरतीसाठी अर्ज करणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe