मुजोर ग्रामसेवकाने लगावली ग्रामस्थाच्या कानशिलात ; पोलिसात गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी ग्रामपंचायत येथील मुजोर ग्रामसेवक दराडे याने ग्रामस्थाच्या कानशिलात लगवल्याने त्याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, हंगेवाडी येथे नळाला प्यायचे पाणी येत नसल्याची तक्रार घेऊन महिला गेल्या असता ग्रामसेवकांनी ग्रामस्थांना गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली.

त्यानंतर ग्रामस्थांनी हंगेवाडी सरपंचांना ग्रामस्थांशी असभ्य भाषेत बोलणार्‍या ग्रामसेवकाची लेखी स्वरूपात तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली होती.

तसेच हंगेवाडीचे ग्रामस्थ अमोल शेळके यांनी दिलेल्या अर्जाचे काम कुठपर्यंत आले या चौकशीसाठी गेले असता.

हंगेवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक दराडे यांनी अमोल शेळके यांना विचारणा केली की, आपण माझ्या विरोधात प्रसारमाध्यमांना बातमी का दिली.

ग्रामसेवकाने प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातमीचा राग मनात धरून अमोल शेळके यांच्या कानशिलात मारली.

सदर प्रकरणी अमोल शेळके यांनी आश्वी पोलीस ठाण्यात ग्रामसेवक धराडे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe