अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- विकासात्मक दृष्टीकोन ठेऊन विविध कामे मार्गी लावल्याने स्वतंत्र उपनगर म्हणून मुकुंदनगरचा झपाट्याने विकास झाला. पूर्वी दिल्लीगेट ते माळीवाडा वेस एवढेच शहर मर्यादित होते. मुकुंदनगरसह केडगाव, सावेडी या उपनगरांचा मोठ्या प्रमाणात विकास होऊन शहराला शहरीकरण प्राप्त झाले आहे.
मुकुंदनगर येथील पहिलाच डेंटल क्लिनिक असल्याने नागरिकांची सोय होणार आहे. अद्यावत तंत्रज्ञान व सोयी, सुविधा या क्लिनिकमध्ये उपलब्ध असल्याने नागरिकांना शहरात येण्याची गरज न भासता दातांवर उपचार उपलब्ध होणार असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
मुकुंदनगर येथील बॉम्बे नर्सिंग होमच्या इमारतीत डेंटल कॉर्नर अॅण्ड इम्प्लांट सेंटरचा शुभारंभ आमदार जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक समद खान, आसिफ सुलतान, संजय चोपडा, मराठी पत्रकार परिषदचे सचिव मन्सूर शेख,
ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कुलकर्णी, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, उबेद शेख, डॉ.रिजवान अहमद, साहेबान जहागीरदार, माजी नगरसेवक मुद्दसर अहमद, इंजी. अनिस शेख, नफिस चुडीवाले, डॉ. इमरान शेख, डॉ.रियाज शेख, दंतरोग तज्ञ डॉ. आहद शेख, आरफत शेख, डॉ. आदिबा कुरेशी, डॉ.शहेबाज कुरेशी, समीर खान, बाबा खान, अॅड. फारुक बिलाल आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ.रियाज शेख यांनी हॉस्पिटलचे वैशिष्टये सांगून पाहुण्यांचे स्वागत केले. दंतरोग तज्ञ डॉ. आहद शेख म्हणाले की, दात हा शरीराचा महत्त्वा घटक असून, त्याचे विकार सुरु झाल्यावर त्याचा त्रास व महत्त्व समजते. मात्र दात चांगले
राहण्यासाठी काळजी घेण्याची गरज आहे.
दातांची नियमित तपासणी करणे आवश्यक असून, ते उत्तम राहण्यासाठी काळजी घेणे हा उत्तम पर्याय असल्याचे सांगून, अद्यावत दंत उपचार पध्दतीवर उपलब्ध असणारे सर्व उपचार सुविधांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उबेद शेख यांनी केले. आभार आरफत शेख यांनी मानले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|