विकसीत उपनगर म्हणून मुकुंदनगरची ओळख निर्माण होणार -आ.संग्राम जगताप

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  मुकुंदनगर येथील प्रभाग क्रमांक 3 मध्ये रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले.

यावेळी नगरसेवक समद खान, आसिफ सुलतान, फारुक शेख, शादाब खान, सामाजिक कार्यकर्ते बाबा खान, साहेबान जाहागीरदार, अमोल गाडे, समीर खान, हाजी सलीम, शहा तनवीर, अ‍ॅड.इनामदार, संभाजी पवार, अज्जू शेख, वाहिद हुंडेकरी, डॉ.रिजवान शेख, इंजि.अनिस शेख, वसिम पठाण, अकिस सय्यद, विकार सय्यद, समीर सर, अक्रम शेख, समीर बावर्ची आदी उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, मुकुंदनगर येथे नागरिकांना उत्तम दर्जाचे रस्ते उपलब्ध झाले असून, उर्वरीत रस्त्यांचे काम देखील प्रगतीपथावर आहे. नगरसेवक समद खान व समीर खान यांच्या प्रयत्नातून हा रस्ता मार्गी लावण्यात आलेला असून, शहरातील एक विकसीत उपनगर म्हणून मुकुंदनगरची ओळख निर्माण होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून नगरसेवक समद खान व समीर खान यांच्या पाठपुराव्याने प्रभाग क्रमांक 3 मधील रशीद भटारी घर ते इक्रा स्कूल रोड ते पठाण किराणा ते इक्रा स्कूल कम्पाऊंड पर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार आहे.

सदर रस्त्याचे काम मार्गी लागण्यासाठी खान यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नाने आखेर या रस्त्याचे काम सुरु झाल्याने नागरिकांनी त्यांचे व आमदार जगताप यांचे विशेष आभार मानले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe