अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :-नगर जिल्ह्यात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला आहे. यामुळे नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात येत आहे.
मात्र अनेकांना लसीकरण केंद्राचा शोध घेणे आदी गोष्टींच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र आता नागरिकांची हि शोधाशोध आता थांबणार आहे.
कारण मनपाने नागरिकांच्या सोयीसाठी एक महत्वाचे पाऊल टाकले आहे. नगर शहरात महापालिकेच्या केंद्रांवर लसीकरण सुरू असले तरी ऑनलाईन नोंदणी करूनही बुकिंग स्लॉट नक्की होतं नाही अशा तक्रारी वाढल्या आहेत.
लसीकरण केंद्रांवर गेल्यावर अनेकदा तासोनतास रांगेत थांबूनही लस मिळत नाही. या पार्श्वभूमीवर नगर महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी व्हाटस् अप क्रमांक जाहीर केला आहे.
लसीकरण केंद्र तसेच लसीकरण संदर्भातील तक्रारी या क्रमांकावर नोंदवता येतील असे मनपाने कळवले आहे.
लसीकरण केंद्र शोधण्यासाठी अथवा काही तक्रार असल्यास [+९१]९०१३१५१५१५ हा व्हॉटस्अॅप नंबर आपल्याकडे सेव्ह करा आणि यावर आपली तक्रार नोंदवा.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|