अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-विविध मागण्यांसाठी मनपा कर्मचारी मंगळवारपासून (२७ एप्रिल) धरणे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिली.
तसे पत्र आयुक्त शंकर गोरे यांना संघटनेतर्फे देण्यात आले. कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान अद्याप मिळालेले नाही.

file photo
त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक मोहिमेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
मनपा प्रशासनाकडून पेन्शन व पगारासाठीचे अनुदान मिळण्यासाठी पाठपुरावा होणे गरजेचे आहे.
मनपा कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यास उपचारासाठी आॅक्सिजन व व्हेंटीलेटर बेडसह स्वतंत्र कोविड केअर सेंटरची उभारणी करावी,
सर्व कर्मचाऱ्यांची सक्तीने रॅपिड व आरटीपीसीआर टेस्ट, मास्क, गमबूट, सॅनिटायझरचे वाटप करावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|