चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मनपा आरोग्य समिती प्रयत्नशील

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9  मे 2021 :- कोरोना संसर्ग विषाणूंचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आरोग्य सुविधा पुरविण्यास अडचण निर्माण होत आहेत.

यासाठी हॉस्पिटल शहरातील कोवीड सेंटर व खासगी हॉस्पिटलमधील सुविधांची माहिती घेऊन कोरोनाबाधित रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

काही कोरोनाबाधित रुग्ण ऑक्सिजनअभावी जीव गमावत आहेत. प्रत्येक कोविड सेंटरमध्ये २० बेडचे ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, लवकरच आरोग्य विभाग व प्रशासनाशी बैठक घेऊन आरोग्यसेवेच्या उपाययोजना केल्या जातील.

आ.संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या नेतृत्वाखाली मनपा आरोग्य समितीमार्फत कोरोना रुग्णांना चांगले आरोग्य चांगले आरोग्य सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन मनपा आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे यांनी केले.

नगर शहरातील विविध कोविड सेंटरला मनपा आरोग्य समितीच्या वतीने भेटी देऊन आरोग्य सुविधाची माहिती घेताना समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे, सदस्य निखिल वारे, संजय ढोणे, सतीश शिंदे आदींसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी नगरसेवक निखिल वारे म्हणाले की, नगर शहरातील कोरोना बाधित रुग्णांना चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मनपा आरोग्य समिती प्रयत्नशील आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe