अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- कर्मवीर शंकरराव काळे यांनी सर्वसामान्य जनतेचा विचार करून तालुक्यात विकासाचा पाया रचला. तो वारसा माजी आमदार अशोकराव काळे यांनी पुढे चालवत तालुक्याच्या विकासाचे महत्वाचे अनेक प्रश्न सोडवले.
मला देखील जनतेने सेवा करण्याच्या दिलेल्या संधीतून हा वारसा पुढे चालवण्याची माझी जबाबदारी आहे, अशी ग्वाही देत कोपरगाव तालुक्याच्या विकासाचे अनुत्तरीत प्रश मार्गी लावणे हे माझे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे,
कारभारी आगवन, छबुराव आव्हाड, काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक पद्माकांत कुदळे, विठ्ठलराव आसने, बाळासाहेब बारहाते,
जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने आदी यावेळी उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम