अखेर न्यायालयाने बोठे बाबत ‘तो’ आदेश काढला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी हत्याकांडाचा सूत्रधार सूत्रधार पत्रकार बाळ. ज. बोठे याच्या अटकेसाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहे,

मात्र पोलिसांना यश येत नाही आहे. जरे यांच्या हत्याकांडातील आरोपी बाळ बोठेला पारनेर न्यायालयाने फरार घोषित केले आहे.

तीन महिन्यांपासून बोठे सापडत नसल्याने शेवटी पोलिसांनी न्यायालयात धाव घेत बोठेला फरार घोषित करण्यात यावे असा अर्ज दिला होता. न्या. उमा बोर्‍हाडे यांनी त्यावर निर्णय घेत बोठेला फरार घोषित करण्याबाबतचा आदेश काढला आहे.

9 एप्रिल पर्यंत बोठेला न्यायालयासमोर हजर राहण्याबाबत आदेश दिले आहे. जर तो हजर राहिला नाही तर त्याची प्रॉपर्टी जप्त करण्यासह अन्य पुढील कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News