नगरकर सावधान : रुग्ण वाढत आहेत … अन्यथा तिसरी लाट कोणत्याही क्षणी !

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-   नगर शहरातील कोरोना बाधितांची संख्या जूनच्या शेवटच्या आठवड्यात अपवाद वगळता सरासरी १० च्या आत होती. परंतु, जुलैपासून हा आकडा दहाच्या पुढे गेला आहे. सोमवारी दिवसभरात नवे २० कोरोना बाधित रूग्ण आढळले.

शहरात हा आकडा आता पुन्हा एकदा कासव गतीने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.नगर शहरातील कोरोनाची दुसरी लाट मे महिन्यात केलेल्या कडक लाॅकडाउनमुळे परतवण्यात यश आले.

त्यानंतर रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाल्यामुळे नगर शहरातील निर्बंध शिथील करून बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या. परंतु, जूनअखेरीस पुन्हा एकदा निर्बंध वाढवण्यात आले असून सायंकाळी चार वाजेपर्यंतच या आस्थापना खुल्या ठेवता येणार आहेत.

तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी मनपा प्रशासनासह जिल्हा प्रशासन सज्ज आहे. त्याची तयारीही केली आहे. शहरात आतापर्यंत एकुण एकुण ५६ हजार ५११ कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत, त्यापैकी ५४८२० उपचार घेऊन बरे झाले.

सर्वाधिक नुकसान दुसऱ्या लाटेत झाले असून आतापर्यंत ९३० जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. जूनच्या अखेरीस कोरोना रूग्णसंख्येची वाढ कमी होती. २६ जून ११ रुग्ण, २७ जून १८, २८ जून ३, २९ जून ८, ३० जून ४ रुग्ण होते.

१ जुलैला ७, २ जुैल २१, ३ जुलै १२, ४ जुलै १६, ५ जुलै २० अशी रुग्णवाढ सुरू आहे. त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली असून आता प्रत्येकालाच काटेकोरपणे नियम पाळावे लागणार आहेत. अन्यथा तिसरी लाट कोणत्याही क्षणी उधळण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe