अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- मुळे शहरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. गुरूवारी २५ मिनिटे व शुक्रवारी तब्बल तीन तास वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मध्यवर्ती व उपनगर भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
विद्युत विभागाकडे पाठपुरावा करून वीजपुरवठा सुरळीत राहत नसल्याने मनपा प्रशासनही हतबल झाले आहे. तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा वांरवार खंडित होत आहे. वीजपुरवठा काही मिनिटांसाठी खंडित झाल्यास मुळानगर,
विळद व नागापूर येथील पंपींग स्टेशनचा पाणीउपसा सुरळीत होण्यास दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो. तथापि, प्रशासनाने मुळानगर, विळद, नागापूर येथील कार्यरत पंपींग स्टेशन येथून दैनंदिन उपशाचे नियोजन शहराला नियमीत पाणीपुरवठा करण्याचा करण्याचा प्रयत्न केला.
मागील अकरा दिवसांत वारंवार वीजपुरवठा वारंवार खंडित झाल्यामुळे टाक्या वेळेत भरता येत नाहीत. यापार्श्वभूमीवर महापालिकेने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत वारंवार कळवले, तथापि, विजेचा लपंडाव सुरूच आहे. त्यामुळे शुक्रवारी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
शुक्रवारी शहरातील सर्जेपुरा, तोफखाना, सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, ख्रिस्त गल्ली, कापड बाजार, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, सावेडी भागाला कमी दाबाने व उशिरा पाणीपुरवठा झाल्याचे मनपाकडून स्पष्ट करण्यात आले.
वीजपुरवठ्याची अडचण अद्याप दूर न झाल्यामुळे महापालिका प्रशासन हतबल झाले असून आता नागरिकांनाच पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला देत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम