अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-मुख्य जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम नियोजित वेळेत न झाल्यामुळे नगर शहरातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन कोलमडले.
मनपाने रविवारी ज्या भागाला पाणी देण्याचे त्या भागाला पाणी मिळाले नाही. त्यामुळे नगरकर पाण्याची वाट पाहात आहेत.
मनपाने शहर पाणी पुरवठा योजनेवरील मुख्य जलवाहिन्यांच्या दुरुस्ती कामांसाठी शनिवारी (३ एप्रिल) सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शटडाऊन घेतले होते.
त्यामुळे पाणी उपसा थांबून नियोजित ठिकाणी एक दिवस उशिराने पाणी येणार असल्याचे स्पष्ट झाले होते.
परंतु दुरुस्तीला पुन्हा विलंब झाल्यामुळे शनिवारी सुरू झालेले दुरुस्तीचे काम रविवारी दुपारपर्यंत सुरू होते.
त्यामुळे बोल्हेगांव, नागापूर, पाइपलाइन रोड परिसर, मुकूंद नगर, स्टेशन रोड, केडगाव, नगर कल्याण रोड, भागाला रविवारीही पाणी मिळाले नाही.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|