Nagpur-Hyderabad Expressway : नागपूर वासियांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) अर्थातच स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग आणि नागपूर गोवा महामार्गानंतर अजून एक महामार्गाची नागपूरवासियांना भेट दिली जाणार आहे.
या दोन महामार्गामुळे नागपूर तसेच संपूर्ण विदर्भाच्या विकासाला मोठी जालना मिळणार आहे. एवढेच नाही तर या दोन महामार्गामुळे महाराष्ट्राच्या विकासाला देखील गती मिळणार आहे. अशा परिस्थितीत आता केंद्रीय सडक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. नितीन गडकरी यांनी लवकरच नागपूर ते हैदराबाद महामार्ग तयार करणार असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे विदर्भाच्या विकासाला अजून गती मिळणार आहे.
![nagpur hyderabad expressway](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Image-2022-10-27-at-9.07.15-PM.jpeg)
या राष्ट्रीय महामार्गमुळे विदर्भासह राज्यातील कृषी क्षेत्राला तसेच उद्योग क्षेत्राला मोठा लाभ मिळणार आहे. सदर होऊ घातलेल्या महामार्गामुळे नागपूर ते हैदराबाद अंतर कमालीचे कमी होणार आहे शिवाय यासाठी प्रवाशांचा वेळ देखील वाचणार आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी बुधवारी नागपुरात पत्रकारांशी चर्चा करताना सदर महामार्ग लवकरच गतिमान होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
नितीन गडकरी यांनी दिलेल्या संकेतानुसार सदर होऊ घातलेला महामार्ग हा आठ पदरी राहणार असून यामुळे नागपूर ते हैदराबाद हे अंतर कमी वेळेत पार करता येणे प्रवाशांना शक्य होणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, सध्या नागपूर ते हैदराबाद प्रवास करण्यासाठी आठ तासांपेक्षा अधिक वेळ लागतो. मात्र सदर होऊ घातलेला नागपूर हैदराबाद महामार्ग निर्माण झाल्यानंतर प्रवाशांना अवघ्या साडेतीन तासात हे अंतर पार करता येणार आहे. यामुळे निश्चितच नागपूर ते हैदराबाद प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे सोयीचे होणार आहे.
मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे समृद्धी महामार्ग आता अंतिम टप्प्यात आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार आणि एका मीडिया रिपोर्टनुसार या महामार्गाचे लोकार्पण नोव्हेंबरमध्ये होणार आहे. अशा परिस्थितीत नागपूरवासीयांना या महामार्गाचा देखील मोठा लाभ मिळणार आहे. मित्रांनो समृद्धी महामार्ग हा मोठा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेला महामार्ग आहे. या महामार्गामुळे विदर्भाच्या विकासाला मोठी गती मिळणार असून यामुळे कृषी क्षेत्राचा देखील वेगाने विकास होणार आहे.
दरम्यान आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर ते हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग लवकरच तयार होणार असल्याचे संकेत दिल्याने निश्चितच महाराष्ट्राच्या विकासाला यामुळे गती मिळणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सदर होऊ घातलेला नागपूर हैदराबाद महामार्गाचा डीपीआर सुद्धा तयार झाला आहे. यामुळे या महामार्गाचे लवकरच काम सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, महाराष्ट्राची उपराजधानी अर्थातच नागपूर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अर्थातच पुणे या दोन शहरांमध्ये प्रवासासाठी अद्यापही विशेष अशी सुविधा उपलब्ध नाही.
सद्यस्थितीला पुण्याहून नागपूरपर्यंत प्रवास करण्यासाठी सुमारे 15 तास एवढा वेळ लागत आहे. अशा परिस्थितीत हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला लागून जालना ते अहमदनगर आणि पुण्याला जोडण्यासाठी एक नवीन महामार्ग बनवण्याची योजना शासनाची असल्याचे समजत आहे. निश्चितच सदर शासनाची योजना प्रत्यक्षात अमलात आली तर प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. याव्यतिरिक्त बुधवारी पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा देखील केली आहे. नितीन गडकरी यांच्या मते पुढील वर्षी त्यांना 25,000 कोटी रुपयांचे रस्ते महाराष्ट्रात बिल्डप करायचे आहेत निश्चितच यामुळे महाराष्ट्रातील दळणवळण अधिक सोयीचे होणार आहे.