Ration Card : आता चुटकीसरशी जोडता येणार रेशनच्या यादीतून कापलेले नाव, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Published on -

Ration Card : रेशनकार्ड हे खूप महत्त्वाचे सरकारी कागदपत्र आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे कागदपत्र फक्त गरिबांना अनुदानित रेशन नाही तर ओळखीसाठीही वापरण्यात येते. नागरिकत्वाच्या पुराव्यांसोबतच पत्त्याचा पुरावा यासाठीही याचा वापर केला जातो.

रेशनकार्डधारकांना गहू, साखर आणि तांदूळ इत्यादीच्या खरेदीवर सवलत मिळते. परंतु, काही जणांचे रेशनकार्ड यादीतून नाव कापले जाते. जर तुमचेही नाव कापले असेल तर काळजी करू नका. काही सोप्या स्टेप्समध्ये तुम्ही तुमचे किंवा तुमच्या सदस्यांचे नाव जोडले जाऊ शकते.

अशी आहे नाव कापलेले तपासण्यापासून ते पुन्हा जोडण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया:-

क्रमांक 1

  • ज्यावेळी तुम्ही रेशन घेण्यास जात तेव्हा तुम्हाला तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्याचे नाव काढून टाकले आहे की तुम्हाला ते समजते. त्याशिवाय तुम्हाला ते ऑनलाइन तपासता येते.
  • जर तुम्हाला ते ऑनलाइन तपासायचे असेल तर तुम्हाला http://nfsa.gov.in/Default.aspx या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.

क्रमांक 2

  • आता तुम्हाला ‘रेशन कार्ड’ या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
  • तुम्हाला आता ‘Ration Card Details On State Portals’ असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि पंचायत निवडावी लागणार आहे.

क्रमांक 3

  • तुम्हाला तुमचे रेशन दुकान, डीलरचे नाव आणि रेशन कार्डचा प्रकार निवडावा लागणार आहे.
  • आता तुमच्या समोर शिधापत्रिकाधारकांची एक खूप मोठी यादी दिसेल. त्यावर क्लिक करताच तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्या सदस्याचे नाव कापले आहे की नाही ते समजेल.

क्रमांक 4

  • समजा जर तुमचे किंवा तुमच्या सदस्याचे नाव काढून टाकले असेल तर ते पुन्हा जोडण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागाला भेट द्यावी लागेल.
  • एक फॉर्म भरून कागदपत्रे एकत्र जोडावी लागणार आहेत.
  • त्यानंतर पडताळणी करून 2 आठवड्यांनंतर तुमचे किंवा तुमच्या सदस्याचे नाव रेशन कार्डमध्ये जोडण्यात येईल.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News