नराधम बॉयफ्रेंडने मित्रांसह केला तरुणीवर बलात्कार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-  मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरातील बँडस्टँड भागात एका २० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी तरुणीच्या बॉयफ्रेण्डसह त्याच्या दोन मित्रांना पोलिसांनी अटक केली.

ही २० वर्षीय पीडित तरुणी ११ मे रोजी रात्री वांद्रे पश्चिम येथे असलेल्या बँडस्टँड या समुद्र किनारी फिरण्यासाठी आपल्या बॉयफ्रेंडसोबत आली होती.

तेथे बॉयफ्रेंडसह एकूण तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपी हे मानखुर्द परिसरातील रहिवासी असून ते २० ते २३ या वयोगटातील आहेत.

ही तरुणी घरी आल्यानंतर तिने पोटात दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर तिच्या बहिणीने विचारपूस केल्यानंतर आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे तिने सांगितले.

पीडितेच्या बहिणीने दुसऱ्या दिवशी १२ मे रोजी वांद्रे पोलिस ठाण्यात जात सामूहिक बलात्काराची तक्रार नोंदवली.

या प्रकरणी सुरुवातीला शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण वांद्रे पोलिसांकडे देण्यात आले. वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपीना अटक केली आहे. सर्व आरोपींना १९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe